जळगाव (प्रतिनिधी) – भुसावळ शहरात घातक शस्त्रे घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाल्यावरून उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या पथकाच्या मदतीने दोन जणांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, काडतूस जप्त करण्यात आला आहे.
भुसावळ शहरात वाल्मीक नगर परिसरात ललीत तुलसीदास खरारे (वय २२), जितेन आनंद बोयत (वय २३) दोन्ही रा. वाल्मीक नगर, रामदेव बाबा मंदीर जवळ हे त्यांचे ताब्यात गावठी कट्टा बाळगुन वाल्मीक नगर परिसरात फिरत असल्याची माहीती उप विभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली होती. त्यांनी त्यांचे पथकातील सुरज पाटील, रमण सुरळकर, यासीन पिंजारी, संकेत झांबरे अश्यांना योग्य त्या सुचना दिल्या.
सदर संशयित आरोपी हे पथकास वाल्मीक नगरातील रामदेव बाबा मंदीराजवळ मोटर सायकलवर बसले असल्याचे दिसुन आले. त्यांना जागेवर ताब्यात घेतलं. संशयित ललीत तुलसीदास खरारे (वय २२ रा. वाल्मीक नगर, भुसावळ) याचे कमरेला एक गावठी कट्टा मिळुन आला. दुसरा संशयित जितेन आनंद बोयत (वय २३ रा. वाल्मीक नगर, भुसावळ) याचे खिश्यात दोन जिवंत काडतुस मिळुन आले. वरील पथकाने त्यांना सविस्तर विचारपुस केली. त्यांनी सदरचा गावठी कट्टा (पिस्टल) व दोन जिवंत काडतुस हे संशयित आरोपी पवन किसन खरारे (वय २७ रा. वाल्मीक नगर, भुसावळ) याचेकडुन २७ हजार रुपयांना खरेदी केले बाबत कबुल केले.
लागलीच सदर पथकाने यातील गावठी पिस्टल विक्री करणारा आरोपी नामे पवन किसन खरारे वय 27 रा. वाल्मीक नगर भुसावळ यास ताब्यात घेतले आहे. सदर घटनेबाबत भुसावळ बाजार पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा (पिस्टल), दोन जिवंत काडतूस, दोन मोबाईल व एक मोटर सायकल असा एकुण ८४,000/- रु. कि. चा. मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.