जळगाव (प्रतिनिधी) – चोपडा तालुक्यातील अडावद येथून एकास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गावठी कट्ट्यासह अटक केली आहे. त्यांच्यावर अडावद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एलसीबीचे पोनि किसन नजन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली रविंद्र पाटील, दिपककुमार शिंदे, अविनाश देवरे, संदीप पाटील, प्रवीण मांडोळे यांनी अडावद शहरात शुक्रवारी सायंकाळी ०५ वा.च्या नंतर एक इसम अवैध अग्निशस्त्राची तस्करी करणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने अडावद येथे पोहोचले.
सदर पथकाने अडावद शहरातील बस स्थानकावर सापळा रचून वाडा-यावल बस क्र. एमएच २० बीएल २२७७ हिचेमध्ये बसलेल्या संशयित रमेश घुमरसिंग भिलाला, वय २८, रा. बजारखोद्रा ता. जि. खरगोन मध्यप्रदेश ह.मु. शिंदी ता. भुसावळ यास ताब्यात घेतले. त्याचेकडून २५ हजार रु.किं.चा एक गावठी बनावटीचा कटटा व १ हजार .किं.चा एक जिवंत काडतूस जप्त केली. संशयित आरोपी व मुददेमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी अडावद पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे.