शासकीय , निमशासकीय कर्मचाऱ्यांना दिलासा ; जळगाव जिल्ह्यात विघ्नहर्ता हेल्थकेअर अँण्ड मेडीकल सर्व्हिसेसची योजना
जळगाव ( प्रतिनिधी ) – ३ लाखांपर्यंत रुग्णालयाचा खर्च आधी कंपनी भरणार तुम्ही वैद्यकीय बिल मंजुरीनंतर पैसे द्या , अशी शासकीय , निमशासकीय कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी योजना आता जळगाव जिल्ह्यात विघ्नहर्ता हेल्थकेअर अँण्ड मेडीकल सर्व्हिसेसकडून राबवली जाणार आहे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना या ‘आरोग्य समृद्धी योजनेचा’ लाभ घेण्याचे आवाहन विघ्नहर्ता हेल्थकेअर अँण्ड मेडीकल सर्व्हिसेसच्या संचालक मंडळाने केले आहे
विघ्नहर्ता हेल्थकेअर अँण्ड मेडीकल सर्व्हिसेसने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , ही योजना कोणतीही मेडिक्लेम किंवा इन्शुरन्स नसून कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती करतांना येणाऱ्या अडचणींवर प्रभावी उपाय म्हणून काम करण्याच्या हेतूने अमलात आणली गेली आहे .
शासकीय किंवा निमशासकीय (१००% अनुदानित) कार्यरत कर्मचारी या योजनेस पात्र आहे. आरोग्य समृध्दी योजनेचा लाभ राज्य सेवा (वैद्यकिय देखभाल) नियम १९६१ नुसार निर्गमित नियम व सुधारणेनुसार स्वतः व कर्मचाऱ्यावर अवलंबून त्याच्या कुटुंबातील सभासद जसे पती/पत्नी, पहिली दोन मुले, दि. १ मे २००१ पूर्वी जन्मलेले ३ रे अपत्ये, आई-वडील, सासू- सासरे हे पात्र राहतील.
कर्मचाऱ्यावरील अवलंबून असलेल्या अपत्याचे वय हे २५ पेक्षा कमी असेल व त्याचे लग्न झालेले असेल मात्र तो नोकरीस नसेल तर या योजनेस पात्र आहे. महिला कर्मचाऱ्याच्या बाबतीत आई वडील किंवा सासू सासरे राज्य , केंद्र सरकारी व निमसरकारी सेवेतून सेवानिवृत्त असल्यास व त्यांना निवृत्ती वेतन मिळत असेल अथवा नसेल तरी अन्य मार्गांनी मिळणारे उत्पन्न दरमहा ९०००/- इतके मूळ निवृत्ती वेतन घेणाऱ्या सेवानिवृत्ती राज्य शासकीय कर्मचाऱ्याला मिळणाऱ्या उपलब्धीच्या मर्यादेत म्हणजे ९०००/- कमी असेल तर या योजनेच्या लाभास पात्र असतील
महाराष्ट्रातील नामवंत हॉस्पिटलमध्ये २७ आकस्मिक व ५ गंभीर आजारांसाठी ॲडमिट झाल्यावर २४ तासात कॅशलेस सेवा उपलब्ध करून दिली जाईल .
३ लाखांपर्यंत कॅशलेसचा फायदा (ना देयकाचा समावेश नाही.) दिल्यावरही ३ लाखांपर्यंत कॅशलेस संपल्यानंतर गरज भासल्यास ॲडिशनल २ लाख कॅशलेसची सुविधा संपूर्ण कुटूंबासाठी राखीव असेल. डिस्चार्जच्या वेळी ना देयक सोडून कोणतेही बिल न भरता डिस्चार्ज मिळेल. डिस्चार्ज नंतर वैद्यकीय प्रतीपुर्ती फाईल बनविणे, फाईल कार्यालयात जमा करणे, जिल्हा शल्यचिकित्सकाकडून पारित करणे, कार्यालयातील जमा बिलाचे फॉलोअप घेणे इत्यादी कामे कंपनी करते.
डिस्चार्ज करतेवेळी वैद्यकीय प्रतिपूर्तीचे सर्व कागदपत्रवर सहीकरून देणे बंधनकारक आहे. सॅलरी अकाऊंटचा (अकाऊंट पे) चेक व प्रॉमीसरी नोट देणे बंधनकारक राहील. बिल पारित झाल्यानंतर कर्मचाऱ्याच्या अकाऊंटला जमा झालेली रक्कम कंपनीला डिस्चार्जच्या वेळी दिलेल्या सॅलरी अकाऊंटच्या चेकने २४ तासात देणे बंधनकारक राहील.
जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी अधिक माहितीसाठी संस्थेच्या मुख्य कार्यालयाशी प्लॉट नं.14, सर्व्हे नं.397, समर्थ कॉलनी, एम.जे. कॉलेजजवळ, जळगांव या पत्त्यावर संपर्क साधावा असे आवाहन संचालक मंडळाने केले आहे.