जामनेर ( प्रतिनिधी ) – जामनेर तालुक्यातील पाळधी येथे वाकि रोड परिसरात युवा सेना जामनेर तालुका आयोजित विश्वजीत राजे चषक2022 क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे व शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ मनोहर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले
याप्रसंगी डॉ वैभव पाटील , युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजीत राजे पाटील, शिवसेना प्रवक्ता गणेश पांढरे , सुधाकर शेठ सराफ , एड भरत पवार, कैलास माळी , उस्मान भाई , सुनील अग्रवाल, भैया गुजर, अभिषेक पाटील, कैलास दांडगे, नाना पाटील, जामनेर शहर प्रमुख ज्ञानेश्वर जंजाळ, रोजगार हमी सदस्य अरुण सावकारे , पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज स्व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले
प्रास्ताविक व सूत्रसंचालन वैद्यकीय कक्ष प्रमुख ईश्वर चोरडिया तर आभार मुकेश जाधव यांनी मानले या कार्यक्रमासाठी पवन जाधव, सुरेश माळी , मुकेश जाधव, निलेश जाधव , पवन सूर्यवंशी, दत्ता धनगर आदींनी परिश्रम घेतले.