जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील आकाशवाणी चौक येथून ६० वर्षीय वृद्ध महिलेच्या जवळील २६ ग्रॅम वजनाचे सोन्याची चैन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत गुरुवार १९ जानेवारी दुपारी १ वाजता जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत जिल्हापेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, आशाबाई रविंद्र पाटील (वय – ६०, रा. कुंभारखेडा, ता.जि.जळगाव) या वयोवृद्ध महिला बुधवार १८ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता आपल्या वैयक्तिक कामासाठी आकाशवाणी चौक येथे आलेल्या होत्या. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने त्यांच्याजवळ असलेली सोन्याची २६ ग्रॅम वजनाची चैन हातचालाखिने त्यांच्या जवळून चोरून नेली. हा प्रकार वृद्ध महिलेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सोन्याची चैनचा सर्वत्र शोध घेतला. त्यांना सोन्याची चैनबद्दल काहीही माहिती न मिळाल्याने जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून गुरुवार १९ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता अज्ञात चोरट्यांवर जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस कर्मचारी वंदना राठोड करीत आहे.