• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जामनेर शहरासह तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 20, 2021
in जळगाव
0

जामनेर (प्रतिनिधी) – जामनेर शहरात मोठ्या उत्साहात शिवजयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

दि. 19 फेब्रुवारी रोजी महाराजांच्या 391 वी जयंती निमित्ताने मिरवणुका, प्रतिमापूजन, रक्तदान शिबिर, तसेच व्याख्यान आदींची मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले होते.
जामनेर नगरपालिका चौकात प्रतिमा पूजनासाठी एकाच वेळी दोन स्टेज लागले होते, त्यामुळे एकाच वेळी गर्दी जमा झाली. त्यात वाकी रोड येथील ढोल पथक चौकात आले असता कारणाने शिवभक्तांना मध्ये बाचाबाची झाली व रेटारेटी झाली. या रेटारेटी मध्ये एक ढोल वाजवणारी मुलगी जखमी झाली व काही काळ गोंधळ निर्माण झाला.

भगवा रॅली
शहरातील उत्साही तरुणांनी भगवा रॅलीचे आयोजन केले होते. सोनबर्डी स्थित महादेव मंदिरा पासून मोटार सायकल रॅलीला सुरुवात होऊन जळगाव रोड ते भुसावळ रोड ,जामनेर पुरा भागातून, नगर खाना चौकातून नगरपालिका चौकात रॅलीचा समारोप करण्यात आला व शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या भगवा रंग रॅली आयोजकांमध्ये राहुल चव्हाण ,सचिन बोरसे ,अविनाश बोरसे, आकाश बंडे, गोपाळ बरकले ,दीपक राजपूत, दिपक माळी ,धनराज माळी , दीपक खाटीक यांचा समावेश होता.

मराठा सेवा संघ विजयानंद हॉस्पिटलतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन
शिवजयंती निमित्ताने गेल्या अनेक वर्षापासून विजयानंद हॉस्पिटलतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असते. या वर्षी हे रक्तदान शिबिराचे आयोजन मराठा सेवा संघ व विजयानंद हॉस्पिटल यांच्यातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रेड प्लस सोसायटी व शासकीय रुग्णालय जळगाव रक्तपेढी यांनी 122 रक्ताच्या बॅग संकलित केल्या. कोरोना च्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टंसिंग व मास्क चा वापर करण्यात आला होता व इतरही शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले होते. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. नंदलाल पाटील, डॉ. प्रशांत पाटील ,डॉ. प्रशांत महाजन ,डॉ.विजया पाटील, शालिनी पाटील, देशमुख काका, राजेंद्र महाले, किरण पाटील, सुरेश भोलाने, विकास सोनवणे, प्रफुल्ल पाटील, महेश राणे,अंगद पाटील प्रेम तंवर आदींनी परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश चव्हाण यांनी केले.यावेळी आमदार गिरीश महाजन, अशोक चौधरी ,वंदनाताई चौधरी ,किशोर पाटील व जे.के .चव्हाण आदी उपस्थित होते. रावसाहेब बापू महाराज चिंचखेडेकर व श्याम चैतन्य महाराज हे विशेष उपस्थित होते.

शिवप्रतिष्ठान वाकी रोड जामनेर
शिवप्रतिष्ठानच्या ढोल-ताशे मंडळाच्या शोभायात्रेला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने कार्यकर्त्यांनी नगरपालिका चौकात जाऊन शिव प्रतिमेचे पूजन केले व काही काळ गोंधळ निर्माण झाला.
ग्लोबल महाराष्ट्र हॉस्पिटल जामनेर येथे मोफत डोळ्यांचे शिबीर तसेच वेगवेगळे रोगनिदान शिबिर घेण्यात आले.134 मोफत ओ.पि. डी. करण्यात आली.

जामनेरात शिवभक्तांकडून कायद्याचे उल्लंघन झाले.
जामनेर पोलिसात कायद्याचे उल्लंघन झाल्यामुळे जवळपास शंभर जणांविरुद्ध गुन्हे नोंद करण्यात आले.जामनेर गोपनीय पोलिसांतर्फे पोलीस नाईक सुनील माळी यांच्या फिर्यादीवरून राहुल चव्हाण ,सचिन बोरसे ,अविनाश बोरसे ,आकाश बंडे ,गोपाल बरकले ,दीपक राजपूत ,दिपक माळी ,धनराज माळी,दिपक खाटीक यांच्यासह शंभर जणांविरुद्ध भा द वि कलम 269,270,188 व मुंबई पोलीस अधिनियम नुसार135 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे हे करीत आहेत.


 

 

Previous Post

विद्यार्थ्याच्या हातातील मोबाईल दोघांनी लांबविला ; गुन्हा दाखल

Next Post

शिवजयंती साजरी करणे गुन्हा असेल तर असे लाख गुन्हे अंगावर घ्यायला तयार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शिवजयंती साजरी करणे गुन्हा असेल तर असे लाख गुन्हे अंगावर घ्यायला तयार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव महानगरपालिकेत आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात बैठकीमध्ये विविध सूचना
1xbet russia

जळगाव महानगरपालिकेत आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात बैठकीमध्ये विविध सूचना

June 16, 2026
शालकासह दोघांच्या त्रासाला कंटाळून प्रौढाची आत्महत्या, गुन्हा दाखल
1xbet russia

 मुडी येथे तलवार घेऊन दहशत माजवणारा युवक पोलिसांच्या ताब्यात

June 16, 2026
तापी-पूर्णा खोऱ्यातील ‘अभ्यासू नेतृत्व’ विधानपरिषदेत पोहोचणार !
1xbet russia

तापी-पूर्णा खोऱ्यातील ‘अभ्यासू नेतृत्व’ विधानपरिषदेत पोहोचणार !

June 16, 2026
रिंग रोडच्या दुरवस्थेवरून महापौर संतापल्या; मनपाच्या प्रलंबित कामांबाबत अधिकाऱ्यांना विचारला जाब!
1xbet russia

रिंग रोडच्या दुरवस्थेवरून महापौर संतापल्या; मनपाच्या प्रलंबित कामांबाबत अधिकाऱ्यांना विचारला जाब!

June 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव महानगरपालिकेत आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात बैठकीमध्ये विविध सूचना

जळगाव महानगरपालिकेत आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात बैठकीमध्ये विविध सूचना

June 16, 2026
शालकासह दोघांच्या त्रासाला कंटाळून प्रौढाची आत्महत्या, गुन्हा दाखल

 मुडी येथे तलवार घेऊन दहशत माजवणारा युवक पोलिसांच्या ताब्यात

June 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon