पारोळा ( प्रतिनिधी ) – येथील राष्ट्रिय महामार्गालगत बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे काल दि. १९ फेब्रुवारी शनिवार रोजी शिवजयंती निमित्त प्रतिमा पूजन, व्याख्यान आणि गौरव सोहळा असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या चंद्रकांत बी पाटील मा नगराध्यक्ष पारोळा यांच्या हस्ते जेष्ठ पत्रकार छत्रपती शिवराय आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जेष्ठ पत्रकार बाळासाहेब पाटील , डी आर पाटील, संजय भावसार, उप प्राचार्य राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय पारोळा, रवींद्र बागुल सहा पो निरीक्षक जगदीशअफ्रे,संजय सूर्यवंशी उपस्थित होते.
कार्यक्रमातील प्रमुख वक्ते पंकज बाविस्कर यांनी शिवचरित्र आणि सामाजिक कार्य यांची माहिती देत शिवरायांचे विचार अंगीकारने महत्त्वाचे असल्याचे सांगितलें. शिवरायांनी आपल्या स्वराज्यात जातीयता न पाळता बारा बलुतेदारांना समान न्याय व हक्क देत एकतेचा संदेश दिला असून शिवरायांच्या आदर्श आपण घ्यावा असे कार्यक्रमाचे अध्यक्ष-चंद्रकांत बी पाटील यांनी सांगितले.
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना शिवरायांची मूर्ती आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. सदर कार्यक्रमात मंडळ अधिकारी शांताराम पाटील, निशिकांत माने तलाठी, भूषण बाविस्कर तलाठी, डॉ पृथ्वीराज पाटील, भिकन अहिरे, सुयोग गॅस एजन्सीचे संचालक रवींद्र सोनार ,छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, संदीप भाऊ पाटील फौजी ,शेख जुबेर, संजय भोसले, सुनील जाधव सर, शैलेश पाटील सर, जयेश पाठक, सचिन पाटील सर, संदीप पाटील सर, प्रवीण वानखेडे यांच्यासह सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, शहरातील मान्यवर तसेच भिम आर्मी सामाजिक संघटनेचे- तालुका प्रमुख जितेंद्र एम वानखेडे,भाऊसाहेब सोनवणे, प्रताप पाटील, मनोहर केदार, अरविंद जाधव, शाम जाधव, अनिल सोनवणे, विनोद पाटील, सचिन खेडकर, शोभाताई पाटील, नीलम वानखेडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन हर्षल सूर्यवंशी यांनी केले.