नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – आज शेतकरी आंदोलनाचा 25वा दिवस आहे. नवे कृषि कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं दिल्लीच्या वेशीवर आंदोलन सुरु आहे. कडाक्याच्या थंडीतही आपल्या मागण्यांवर ठाम असणाऱ्या शेतकऱ्यांचा सरकारविरोधातील लढा सुरुच आहे. आपले आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाच्या राष्ट्रव्यापी बैठकीमध्ये एकमताने काही निर्णय घेण्यात आले आहेत.

दिल्लीच्या विविध सीमांवर शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकरी संघटनांनी आतापर्यंत आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना शहीदांचा दर्जा दिला आहे. तसेच शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या या सर्व शेतकऱ्यांसाठी श्रद्धांजली सभा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.







