यावल (प्रतिनिधी) – भारताचे माजी पंतप्रधान स्वगीय राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त यावल तालुका व शहर कॉग्रेस कमीटीतर्फे त्यांच्या प्रतिमेला कॉग्रेस जि.प. गटनेते मा.प्रभाकर आप्पा सोनवणे व भगतसिंग बापु पाटील यांच्या हसते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी कॉग्रेस कमीटीचे शहर अध्यक्ष कदीर खान, ता.उपाध्यक्ष हाजी गफफार शाह, सरपंच समाधान पाटील, युवक जि.उपाध्यक्ष ईमरान पहेलवान, सेवा दल अध्यक्ष नईम शेख, शरद भाऊ ,वढोदे मा.सरपंच लिलाधर भाऊ यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.







