नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या ७५वी जयंतीनिमित्त देशभर त्यांना अभिवादन केले जात आहे. कॉग्रेस नेते राहुल गांधी यांनीही राजीव गांधींना श्रद्धांजली अर्पण केली. आपल्यासारख्या दूरदर्शी आणि उदार व्यक्तीचा मुलगा असणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे, अशी भावना राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे.
राहुल गांधी म्हणाले कि, राजीव गांधी दूरदृष्टीकोन असणारे आणि काळापेक्षा एका पाऊल पुढे असणारे व्यक्ती होते. तसेच त्यांचे उदार आणि प्रेमळ व्यक्तिमत्व होते. तुम्ही वडिलांच्या रूपात लाभल्याने मी स्वतःला भाग्यवान समजतो.
दरम्यान, राजीव गांधी यांनी देशाच्या विकासाठी मोठे योगदान दिले आहे. २१ मे १९९९१ रोजी तामिळनाडूतील श्रीपेरुंबुदूर येथे घडवून आणलेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात राजीव गांधी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.







