• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डॉ. दाभोलकरांच्या हत्येचे सूत्रधारांना तपास यंत्रणेने तत्काळ अटक करावी – महाराष्ट्र अंनिस

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 20, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी २० ऑगस्ट २०१३ रोजी त्यांचे समाजसुधारणेसाठी बलिदान दिले. शहीद नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आता ७ वर्षे पूर्ण झाले आहेत. हत्येतील आरोपी तपास यंत्रणेला गवसले मात्र त्यांचे सूत्रधार अद्यापही मोकाट व पडद्याआड आहेत. तपास यंत्रणेने सूत्रधारांना तत्काळ अटक करावी आणि त्यांना जनतेसमोर आणावे अशी मागणी महाराष्ट्र अंनिसने केली आहे.

याबाबतची माहिती गुरुवारी ऑनलाईन पत्रकार परिषदेत समितीचे राज्य सरचिटणीस विनायक सावळे(शहादा), डॉ. ठकसेन गोराणे (नाशिक), जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डी.एस.कट्यारे यांनी दिली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने महाराष्ट्रात समाजसुधारणेची ९ ऑगस्ट रोजी ३१ वर्षे पूर्ण केली. या ३१ वर्षात अंधश्रद्धा निर्मूलन, विवेकवाद, जात पंचायत निर्मूलन, आंतरजातीय विवाह, पर्यावरण, महिलांचे धार्मिक क्षेत्रातील शोषण, मानवतावाद, भारतीय संविधानाचा प्रचार व प्रसार, खगोलशास्त्र, फलज्योतिष, युवा विकास, वैज्ञानिक दृष्टीकोन आदी विषयावर काम करीत असताना बदलाची मोठी क्रांती घडवून आणली आहे. सुमारे ३०० पेक्षा अधिक शाखा उभारून समाज सुधारणेची क्रांती करणारे देशातील एकमेव महाराष्ट्र अंनिस हे संघटन आहे.

प्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी २० ओगस्ट २०१३ रोजी त्यांचे बलिदान दिले. ७ वर्षे उलटले आता तरी सूत्रधारांना अटक करावी अशी अंनिसची मागणी आहे.

डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या खुन्यांना योग्य वेळी अटक होऊन त्यांच्या खुनाचा तपास सूत्रधारापर्यंत पोहचला असता तर त्यानंतर झालेले कॉम्रेड गोविंद पानसरे,प्रा एम एम कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांचे खुन झाले नसते. म्हणूनच अजुनही तपासात होत असलेली दिरंगाई अक्षम्य आहे.

गौरी लंकेश यांच्या खुनाचा तपास करताना तपास करणाऱ्या एसआयटीला असे आढळले आहे कि या चार खूनांच्या मध्ये समान धागा असून परस्पर संबंध आहेच पण या खूनांच्या मागचा हेतू समान असून धार्मिक मुलतत्ववादी या कटात आहेत. सामाजिक कार्यकर्ते आणि समाजसुधारक यांचे होणारे खून थांबवण्यासाठी एका कडक कायद्याची गरज आहे असे अंनिसचे मत आहे. कारण सामाजिक कार्यकर्ते आणि समाजसुधारक याच्या जीवाला सध्या आपल्या समाजात धोका आहे. यासाठी सरकारकडे अंनिसने काही मागण्या करून तपास वेगाने होऊन सूत्रधार कोण तो समोर आणावे अशी मागणी केली आहे. पत्रकार परिषदेला जिल्ह्याचे ४ प्रधान सचिव अशोक तायडे, सुनील वाघमोडे, आर.वाय.चौधरी, मोहन मेढे, जिल्हा समन्वयक विश्वजीत चौधरी, एड.भरत गुजर उपस्थित होते.


 

 

Previous Post

जळगाव महापौरांच्या विनंतीनंतर आ.रमेश पाटलांनी अँटीजन टेस्ट किटसाठी दिला ८ लाखांचा निधी!

Next Post

देशातील स्वच्छ शहरांच्या यादीत भुसावळ ४६ तर जळगाव ६४ व्या क्रमांकावर !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

देशातील स्वच्छ शहरांच्या यादीत भुसावळ ४६ तर जळगाव ६४ व्या क्रमांकावर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon