जामनेर ( प्रतिनिधी ) – सार्वजनिक आरोग्य विभाग , राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्या वतीने आरोग्य मेळाव्याचे आयोजन उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे करण्यात आले होते .आरोग्य मेळाव्याचे व उपजिल्हा रुग्णालय येथील हजार लिटर ऑक्सिजन प्लॅन्टचे उद्घाटन जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी जि.प.सदस्य अमित देशमुख, कमल हॉस्पिटलचे डॉ.प्रशांत भोंडे, जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.पंकज पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनय सोनवणे, डॉ. हर्षल चांदा, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री पाटील, डॉ. पल्लवी राऊत, डॉ. नरेश पाटील, डॉ. राहुल निकम, डॉ. पंकज माळी, डॉ. मनोज पाटील , डॉ. वैशाली चांदा, डॉ. राहुल माळी , आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांची उपस्थिती होती.
तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रावर पूर्व तपासणी करून मोठ्या संख्येने रुग्णांना शिबिरासाठी संदर्भित करण्यात आले होते. आरोग्य मेळाव्यात ५६० लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली. २१२ रुग्णांनी युनिक हेल्थ आय डी कार्डसाठी नोंदणी केली. १२३ जणांना ” आयुष्यमान भारत ” योजनेचे कार्ड वाटण्यात आले. रुग्णांची मोफत तपासणी,मोफत रक्त चाचण्या विशेष तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली. हृदय रोग, मधुमेह, रक्तदाब, मेंदूचे आजार, फुफ्फुसांचे आजर, कोरोना नंतर उदभवलेल्या समस्या , स्त्री रोग, किडनी आजार, मोतीबिंदू, नाक कान घसा, अस्थीरोग, कुष्ठरोग, क्षयरोग, दंतरोग, कॅन्सर , एच.आय.व्ही. इत्यादी आजारांची तपासणी करण्यात आली.
मोफत रक्त , लघवी ,एक्स रे, ईसीजी तपासणी करून गरजू रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जनारोग्य योजनेंतर्गत मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत ५१ नागरिकांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेत्ररोग तंत्रज्ञ पांडुरंग आल्हाड, प्रास्ताविक डॉ.पंकज पाटील यांनी केले . आभार डॉ.राजेश सोनवणे यांनी मानले.