जळगाव ( प्रतिनिधी ) – आज शहर पोलिस स्टेशन व जिल्हा पेठ पोलिस स्टेशन तसेच शाहू महाराज हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने शाहूनगर येथे रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते
या कार्यक्रमाची सुरवात कुराण पठण करून करण्यात आली, मौलाना अख्तर यांनी रोजाचे महत्व सांगितले . डीवायएसपी कुमार चिंता यांनी शांतता सद्भावना , जातीय सलोखा कायम राखण्याचे आवाहन केले, सुप्रीम कोर्टाचे आदेशाप्रमाणे प्रत्येक मंदिर मशिदीच्या भोंग्यांची रितसर परवानगी घेण्याचेही आवाहन केले, अ करीम सालार , जहांगीर खान यांनी मनोगत व्यक्त केले रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन मोहज्जन , याकूब खान, जहांगीर खान, तन्वीर शेख, पाशा, जुबेर खाटीक, रहीम काझी यांनी केले . डॉ सुहास फालक शाहू महाराज हॉस्पिटलचे व्यवस्थापक संतोष नवगडे, डॉ पाटील, एस आय टी जिल्हा प्रमुख अमित मनारे पो नि संतोष परदेशी, काँगेसचे अमजद पठाण तसेच शाहूनगर येथील सर्व रोजेदार यांची उपस्थिती होती.