जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील हरेश्वर नगरातील विवाहितेचा पैशांची मागणी करत छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या ६ जणांविरोधात बुधवार, १९ एप्रिल रोजी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील माहेर असलेल्या किरण शुभम भदाणे यांचा जळगाव शहरातील हरेश्वर नगरातील शुभम जयवंतराव भदाणे यांच्याशी विवाह झाला आहे. लग्नानंतर किरण हिला पती शुभम यांच्यासह सासरच्यांनी गाडी घेण्यासाठी माहेरुन पैसे आणावेत अशी मागणी केली, तसेच याच कारणांवरुन किरण हिचा तिचे पतीसह सासरच्यांनी शारिरीक व मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून किरण ह्या त्यांच्या जळगाव शहरातील दिनानाथ वाडी येथील नातेवाईकाकडे निघून गेल्या. व त्यांनी छळाबाबत बुधवारी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला तक्रार दिली. यात तक्रारीवरुन किरण हिचे पती शुभम जयवंतराव भदाणे, प्रतिभा जयवंतराव भदाणे दोन्ही रा. हरेश्वर नगर, जळगाव, नणंद धनश्री राजीव भामरे, नंदोई राजीव प्रकाश भामरे दोन्ही रा. धुळे, नणंद मयुरी अतुल सोनवणे, व नंदोई अतुल सोनवणे दोन्ही रा. अमळनेर या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप पाटील हे करीत आहेत.