जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील जुनी एमआयडीसी परिसरातील एम.एस.ई.बी. कॉलनीतील महिलेची १ लाख २४ हजार ७५४ रुपयांत ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बुधवार, १९ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे.
एम.एस.ई.बी. कॉलनीतील स्वाती विठ्ठल तायडे ( वय – ३३ ) यांनी ऑनलाईन साडी ऑर्डर केली होती. या साडीची डिलेव्हरी ट्रॅक करण्यासाठी ७ एप्रिल रोजी स्वाती तायडे यांनी बी २ स्मार्ट एक्सप्रेस कोरीयर सर्व्हीस या कोरीयर कंपनीच्या वेबसाईटवर असलेल्या क्रमाकांवर फोन केला. या फोनवर संबंधिताने विश्वास संपादन करत स्वाती तायडे यांच्या बँक खात्यातील १ लाख २४ हजार ७५४ रुपये संबंधिताने ऑनलाईन परस्पर वळवून घेतले. प्रकार लक्षात आल्यानंतर तब्बल १२ दिवसानंतर स्वाती तायडे यांनी याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरुन बुधवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक दत्तात्रय गिरधर बडगुजर हे करीत आहेत.