जळगाव ( प्रतिनिधी ) – नवीपेठेतील महाविर ज्वेलर्स दुकानाजवळून एकाची ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शांताराम शालीग्राम वाघ ( वय – ४६ ) रा. सुरेशदादा जैन नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह राहायला आहे. हातमजूरी करून आपला उदरनिर्वाह करतात. १४ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता शांताराम वाघ हे कामाच्या निमित्ताने नवीपेठ येथील महावीर ज्वेलर्स दुकानाजवळ दुचाकी क्रमांक (एमएच १९ सीएच ४०१६) ने आले होते. त्यावेळी त्यांनी ज्वेलर्स दुकानासमोर दुचाकी पार्क करून लावली होती. अज्ञात चोरट्याने ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर बुधवारी १९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता जळगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक राजकुमार चव्हाण करीत आहे.