पारोळा (प्रतिनिधी) – पारोळा येथे भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजू मामा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पार्टी पारोळा शहर व ग्रामीणची विस्तृत बैठक संपन्न झाली.
या बैठकीस माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा तसेच शहर व ग्रामीणचे सरचिटणीस, उपाध्यक्ष,चिटणीस व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.तसेच पारोळा येथे कोरोना काळात अहोरात्र सेवा देणारे डॉ. प्रांजली पाटील, डॉ रविंद्र धनराळे , डॉ ज्ञानेश्वर पाटील ,डॉ गिरीश जोशी ,डॉ सुनील पारोचे यांचा करोना योध्दा म्हणून सन्मान करण्यात आला. राम मंदिर आंदोलनावेळी आयोध्याला गेलेले कारसेवक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अँड. दत्तात्रय महाजन, महेंद्र दाणेज, मनोज अग्रवाल, मनिष अग्रवाल, भानुदास कायस्थ, छोटू वाणी यांचा सन्मान आ.राजुमामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आला.
माजी खासदार तथा ग्रामीण जिल्ह्याध्यक्ष स्व हरीभाऊ जावळे यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करण्यात आले.भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे यांचा जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्या नंतर ते जिल्हाभर कार्यकर्ते व पदाधिकारी यांची भेट व बैठका घेऊन परिचय करुन घेत आहे. त्यांनी त्यांच्या मनोगतात सांगितले की कार्यकत्यांनी रूसवे फुगवे बाजुला ठेवून पक्षासाठी कामाला लागावे कार्यकर्त्याच्या मेहनतीवर लोकप्रतिनिधी असतो म्हणून लोकप्रतिनिधीनी कार्यकर्त्यांना विसरले नाही पाहिजे.त्यांनी सांगितले की येत्या काळात होऊ घातलेल्या निडणूकीसाठी कार्यकत्यांनी सज्ज व्हावे. सतत जनतेच्या अडीअडचणी सोडविण्या करीता जनतेच्या संर्पंकात राहावे. व सर्व लोकप्रतिनीधी व कार्यकर्त्यांनी पक्षशिस्तीचे पालन करावे असे आदेश जिल्हाध्यक्ष तथा आ. सुरेश भोळे यांनी दिले . सदर बैठकीस अँड. अतुल मोरे, धिरज महाजन, विस्तारक सचिन पानपाटील, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गणेश माळी, समाधान पाटील, गणेश पाटील, विश्वास पाटील, केशव क्षत्रिय, गोपाल दाणेज, माणीकलाल जैस्वाल, नरेंद्र साळी, जितेंद्र चौधरी, सचिन गुजराथी, नगरसेविका रेखाताई चौधरी, अँड आफरे मँडम, ग्रामीण व शहराचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.