मुंबई (वृत्तसंस्था) – गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना कोरोनाची लागण झाली आहे. मला कोणतीही लक्षणं नाहीत पण कोरोनाची चाचणी केल्यावर ती पॉझिटिव्ह आली असं प्रमोद सावंत म्हणाले.

सावंत यांनी स्वत: ट्वीट करून ही माहिती दिली. सावंत यांना कोणतीही लक्षणं जाणवत नाहीये आणि त्यांना होम क्वारंटीनचा सल्ला देण्यात आला आहे. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती सावंत यांनी केली आहे. घरून काम करत राहीन असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
काही दिवसांपूर्वी हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या दुसऱ्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना कोरोनाची लागण झाली आहे. मला कोणतीही लक्षणं नाहीत पण कोरोनाची चाचणी केल्यावर ती पॉझिटिव्ह आली असं प्रमोद सावंत म्हणाले.
सावंत यांनी स्वत: ट्वीट करून ही माहिती दिली. सावंत यांना कोणतीही लक्षणं जाणवत नाहीये आणि त्यांना होम क्वारंटीनचा सल्ला देण्यात आला आहे. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती सावंत यांनी केली आहे. घरून काम करत राहीन असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
गेल्या रविवारी त्यांना कोरोना असल्याचं स्पष्ट झालं होतं. आता आणखी काही दिवस त्यांना मेंदाता हॉस्पिटलमध्येच राहावं लागेल.
सुरुवातीच्या काळात गोव्याने कोरोनावर नियंत्रण मिळवलं होतं. मात्र काही महिन्यातच गोव्यातही कोरोनाने हातपाय फैलावले. अनलॉक प्रक्रियेत गोव्यात बाहेरील लोकांचा राबता वाढला. सणासुदीच्या काळात कोरोनासंदर्भातील नियमावलीचं पालन होत नसल्याचंही स्पष्ट झालं.
वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
गोव्यात आतापर्यंत 17 हजार लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यापैकी 13 हजार 577 जण बरे होऊन घरी परतले आहेत. गोव्यात आतापर्यंत कोरोनामुळे 192 लोकांचा मृत्यू झाला आहे.
देशातील कोरोना बाधितांचा आकडा आता 37 लाखांच्या पुढे गेला आहे. गेल्या 24 तासात देशभरात 78,357 नवे रुग्ण सापडले. 29 लाख लोक कोरोनातून बरे झाले आहेत. सुधारणेचा दर 76.98 टक्के एवढा आहे.
देशात आतापर्यंत कोरोनामुळे 66,33 जणांचा तर गेल्या 24 तासात 1,045 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आठ लाखाहून अॅक्टिव्ह केसेस आहेत.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत साडेचार लाखांपर्यंत टेस्ट करण्यात आल्या आहेत.
source: bbc.com/marathi







