जळगाव (विशेष प्रतिनिधी)- भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील एका चौधरी कुटूंबाने पत्नी व अडीच वर्षाच्या बालिकेसह धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची घटना दि.2 रोजी सकाळी घडली. यात एकाची प्रकृती चितांजनक असतांना त्याला उपचारासाठी गोदावरी रूग्णालयात दाखल केले असतांना उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
सविस्तर वृत्त असे की, साकेगाव येथील रहिवासी हरिष शिरीष चौधरी (वय 36) या तरूणाने पत्नी जयश्री हरीष चौधरी (वय 27),व कन्या गुंजन हरीष चौधरी (वय 1.5) धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याचा प्रयत्न केला असता त्यात रेल्वेच्या धडकेत त्याची पत्नी व अडीच वर्षाची मुलगी असे दोघांचा मृत्यू झाला तर हरिेष चौधरी हा तरूण गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चितांजनक असतांना त्याला परिसरातील नागरिकांनी जखमी हरिष यांना उपचारासाठी गोदावरी रूग्णालयात दाखल केले होते.मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मात्र आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही.मात्र पोलिसांकडून नेमक्या कारणांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.