जळगाव (प्रतिनिधी) – देशपातळीवर काम करणाऱ्या व्हाईस ऑफ मिडिया या पत्रकार संघटनेच्या रेडिओ विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी जळगाव येथील पत्रकार अमोल उत्तमराव देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. व्हाईस ऑफ मिडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी बीड येथे मराठवाडा विभागीय अधिवेशनात नियुक्तीपत्र देऊन अमोल देशमुख यांची निवड केली आहे.
अमोल उत्तमराव देशमुख हे जळगाव येथील रेडिओ मनभावन येथे संचालक आहेत, ते गेल्या तेरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. सूचना प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा देण्यात येणारा थिमेटीक नॅशनल अवार्ड २०१८ हा त्यांच्या नेतृत्वात वर्धेतील रेडिओला मिळाला होता. त्यांच्या निवडीचे जळगाव जिल्ह्यातील पत्रकार तसेच रेडिओ श्रोत्यांनी कौतुक केले आहे.