• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

जळगाव शासकीय रुग्णालयात बालकांच्या अदलाबदलीच्या संशयाने गोंधळ

नवजात शिशूंना "डीएनए" चाचणीने मिळणार खरे पालक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 2, 2023
in Uncategorized
0

जळगाव (प्रतिनिधी) – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नजरचूकीत नवजात शिशूंची अदलाबदल झाल्याचा प्रकार मंगळवारी २ रोजी घडला आहे. दोन नवजात शिशुंची अदलाबदल झाल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर पालकांनी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले. मंगळवारी, सकाळी ११ वाजेनंतर ही घटना घडली. दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने दोन्ही बाळांना ताब्यात घेत नवजात शिशु अतिदक्षता विभागात दाखल केले आहे. पोलिसांमार्फत डीएनए टेस्टद्वारे हे शिशु आता खऱ्या मातांच्या स्वाधीन होणार आहेत. हा प्रकार परिचारिकांच्या मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे घडल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

जीएमसीमध्ये प्रसूतीसाठी सुवर्णा सोनवणे (वय २०) आणि प्रतिभा भिल (वय २०) या दोन्ही गरोदर महिला भरती झाल्या होत्या. त्यांची प्रकृती अत्यावस्थ होती. झटके येत होते. त्यामुळे त्यांचे तातडीने सिझर करण्याचा निर्णय स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाकडून घेण्यात आला. शस्त्रक्रिया विभागात पाच ते दहा मिनिटांच्या अंतराने दोघींचे सिझर झाले. एकीला मुलगा व दुसरीला मुलगी झाली.

पण नवजात शिशु पालकांकडे सोपविताना प्रशिक्षणार्थी परिचारिका विद्यार्थीनिकडून संबंधित पालकांना निरोप देण्यात गोंधळ झाला. यामुळे त्यांची अदलाबदल झाली. काही वेळाने ही चूक उघड होताच प्रसूती कक्षात एकच गोंधळ उडाला. दोन्ही नवजात शिशुंचे पालक आक्रमक झाले. त्यांनी डॉक्टर व परिचारिकांना धारेवर धरले. मुलगा व मुलगी नेमकी कोणत्या पालकांची हेच समजत नसल्याने पालकांचा गोंधळ उडत होता. वाद वाढत चालला असल्याने पाहून प्रशासनाने दोन्ही नवजात शिशुंना आपल्या ताब्यात घेतले. त्यांना नवजात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.

खरे पालक शोधण्यासाठी आता दोन्ही शिशु आणि मातांची डीएनए टेस्ट केली जाणार आहे. त्यासाठी पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. दोन्ही माता अत्यावस्स्थ असल्याने अतिदक्षता विभागात दाखल आहेत. रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणी चौकशी समिती गठीत केली आहे. डीएनए चाचणी रक्ताच्या नमु्न्यांच्या आधारे केली जाते. हे नमुने नाशिक येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविले जातात. त्यांच्याकडून अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांनी दिली.

जीएमसीमध्ये नवजात शिशुंची आदलाबदल झाल्याची एका पालकाची तक्रार पोलिसांकडे आली आहे. त्या अनुषंगाने जीएमसीशी पत्रव्यवहार करून बाळांची डीएनए चाचणी करून घेतली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा पेठ पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी दिली.


 

Tags: #jalgaon civil newshttps://kesariraj.com/2-may-23-n-5/
Previous Post

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात आजपासून उल्हास २०२३ ला होणार सुरुवात

Next Post

व्हाईस ऑफ मिडिया रेडिओ विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अमोल देशमुख यांची निवड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

व्हाईस ऑफ मिडिया रेडिओ विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अमोल देशमुख यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon