जळगाव ( प्रतिनिधी ) – त्वचाविकाराची उपचार पद्धती ही खर्चिक असल्याने अनेकदा दुर्लक्ष केले जाते. मात्र त्वचाविकाराला हलक्यात घेऊ नये याकरीता डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात सोमवार दि.१ मे पासून त्वचाविकार शिबिरास सुरुवात झाली. दोन दिवसातच जवळपास १०० रुग्णांनी तज्ञांद्वारे तपासणी करुन घेतली.
१ ते १५ मे २०२३ या कालावधीत रुग्णांसाठी मोफत त्वचाविकार शिबिर घेण्यात आले. डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील पहिल्या मजल्यावर त्वचाविकार विभाग असून येथे तज्ञांद्वारे तपासणी केली जात आहे. शिबिरात केसपेपर, डॉक्टरांद्वारे तपासणी व सल्ला मोफत दिला जात आहे. यात इसब, गजकर्ण, जनाट खाज, कुष्ठरोग, अॅलर्जी तसेच मुरुम, मस, वांग, अंंगावरील पांढरे/काळे डाग, केस गळणे अशा विकाराच्या रुग्णांचा समावेश होता. शिबिरार्थींनी सोमवार ते शनिवार सकाळी १० ते २ या वेळेत येवून तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले.
शिबिरात त्वचा विभाग प्रमुख डॉ.पंकज तळेले यांच्यासह डॉ.दिनेश कुलाळ, डॉ.सागरिका धवाण, चेतना शंकलेचा यांच्याद्वारे तपासणी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. नावनोंदणी व अधिक माहितीसाठी डॉ.दिनेश कुलाळ यांच्याशी ८४५९३९४८१३ या क्रमांकावर संपर्क साधावा.