मुंबई ( प्रतिनिधी ) – मुंबईमधील वाशी येथील फोर पॉईंट्स बाय शेराटोन पंचतारांकित हॉटेलमध्ये यू अँड आय एंटरटेनमेंट प्रस्तुत मिस नवी मुंबई या कार्यक्रमात आर्वी एंटरटेनमेंटचं “लाईफइनस्टाईल” या फॅशन मॅगझीनच्या कव्हर पेजचं लौंचिंग करण्यात आलं.
ही मॅगझीन कव्हर लौंचिंग आर्वी एंटरटेनमेंटचे संस्थापक रूपा शास्त्री आणि सी. इ. ओ. डॉ. विजय शास्त्री यांच्या हस्ते करण्यात आले. या फॅशन मॅगझीनचं डिसाईन सुराज कुटे यांनी केलं आहे. या मॅगझीनच्या लौंचिंगसाठी डॉ. संजीव कुमार, अभिनेत्री रोशनी कपूर, कुणाल ठक्कर, सुरेंदर सिंग गुप्ता, हर्मित सिंग गुप्ता, यश शेलार प्रामुख्याने उपस्थित होते. या फॅशन मॅगझीनमध्ये फॅशन आणि चित्रपट सृष्टीतील दिग्गजांबद्दलचे लेख आणि नवं कलाकारांबद्दलची माहिती संकलित करण्यात येणार आहे.