जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या महिलेचा पाठलाग करत दगड मारून अश्लील वर्तन करून विनयभंग केल्याची घटना गुरुवार १ जून रोजी सायंकाळी ६ वाजता घडली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील एका गावात २६ वर्षीय महिलाही आपल्या परिवारासह राहायला आहे. २३ मे रोजी संध्याकाळी ६ वाजता गावात राहणारा गणेश बाबुराव कोळी यांनी तिचा पाठलाग केला. नंतर तिला दगड मारला. दगड मारण्याचा जाब विचारला असता त्याने महिलेची अश्लिल वर्तन करून तिचा विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने तिथेच आरडा ओरड केली. त्यानंतर तो पसार झाला. पिडीत महिलेने नशिराबाद पोलीस स्टेशनला संशय आरोपी गणेश बाबुराव कोळी यांच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार गुरुवार १ जून रोजी दुपारी ३ वाजता नशिराबाद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव करीत आहे.