जळगाव ( प्रतिनिधी ) – नारीशक्ती बहुद्देशीय संस्था व जायंट्स ग्रूप ऑफ तेजस्विनी ( जळगाव ) यांच्या संयुक्त विद्यमाने कामगार दिनानिमित्त शहरातील हमाल बांधवांना मिल्टान पाण्याची बाटली व रुमाल वाटप आज महापौर जयश्री महाजन यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
कामगार दिनानिमित्त नारीशक्ती बहुद्देशीय संस्था व जायंटस ग्रूप ऑफ तेजस्विनी यांच्या संयुक्त विद्यमाने १ मेरोजी संध्याकाळी जळगाव पीपल्स बँक परिसर, दाणा बाजार येथे दिवसभर उन्हात राबणाऱ्या कामगारांना, हमालांना मिल्टान थंड पाण्याची बाटली व रुमाल वाटप महापौर जयश्री महाजन व अध्यक्षा मनिषा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर जयश्री महाजन यांनी हमाल व कामगाराबद्दल अभिमान व्यक्त केला. नारीशक्ती बहुद्देशीय संस्था सदस्य व जायंट्स ग्रूप ऑफ तेजस्विनी सदस्या भाग्यश्री महाजन, रेणुका हिंगु, योगिता बाविस्कर, शशी शर्मा, नूतन तासखेडकर, आशा मौर्या, वैशाली शिरुडे, उल्का पाटे, निशा चौधरी उपस्थित होत्या.