हिंगोणा ता यावल (प्रतिनिधी) – विविध क्षेत्रात पादाक्रांत करुन महिलां आपला ठसा सर्वच क्षेत्रात उमटवित आहे. चौकटीबाहेरचे क्षेत्र निवडून त्यात कर्तृत्व गाजवणाऱ्यांपैकी न्हावी येथे कार्यरत असलेल्या तलाठी लीना राणे.

महाराष्ट्र शासन महसुल विभाग उपविभागीय अधिकारी कार्यालय याच्या तर्फे तहसिल कार्यालय यावल येथे महसूल दिन साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने सन २०१ ९ -२० मध्ये महसुल विभागाच्या कामकाजात उत्कृष्ट योगदान दिल्यामुळे यावल येथील लीना राणे यांना उत्कृष्ट तलाठी ‘ म्हणून अप्पर जिल्हा अधिकारी प्रवीण महाजन याच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले .
शासकीय कार्यालय आणि सरकारी कर्मचारी म्हटलं की अनेकांच्या भुवया उंचावतात. काहींच्या कपाळावर आठ्या पडतात. पण हा समज खोटा ठरविणारे आणि कर्तव्य दक्ष महिला अधिकारी म्हणून आपल्यातील चांगुलपण सिध्द करून शासकीय नोकरीत प्रामाणिक पणे काम करत असल्याचा प्रत्यय दिला तो उत्कृष्ट तलाठी म्हणून गौरव महसुल दिनानिमित्ताने करण्यात आला.
महसूल विभागाचे कर्मचारी हे घरापेक्षा अधिक वेळ कार्यालयात आपले कर्तव्य बजावत असतात. त्यामुळे त्याचे कार्यालय घरापेक्षाही महत्वाची जागा असते , असे त्या आवर्जून सांगतात. हे केवळ त्यांचे विचार नाहीत तर हे सर्व त्या आपल्या कृतीतून दाखवून देतात. त्यांच्या कार्यपद्धतीतून त्यांनी सामान्यांप्रती असणारी आत्मियता दाखवून दिली आहे.







