जळगाव (प्रतिनिधी) – मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा वनक्षेत्रात निर्यातक्षेत्र राजुरा, कं. नं. ५६५ मध्ये दोन इसमांनी वृक्षतोड केल्याप्रकरणी वनविभागाने दोघांना अटक करून न्यायालयात हजार केले होते. त्यांना उद्या २० नोव्हेंबर पर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली आहे.
वढोदा वनक्षेत्रात अज्ञात इसमांनी वृक्षतोड केल्याप्रकरणी राजुऱ्याचे वनरक्षक यांनी ६ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल केला होता. सदर वनगुन्हाचा तपास सुरु होता. त्यानुसार फरार आरोपी सुभाष भावसिंग पावरा (वय-३७), नानाभाऊ राजपाल पावरा (वय-३६) दोघे रा. धुळे (पावरी पाडा), ता. मुक्ताईनगर यांना १८ नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी ताब्यात घेऊन अटक करण्यात आली होती. दोघा संशयित आरोपींना न्यायालयात हजार केले असता, त्यांना उद्या २० तारखेपर्यंत वणकोठडी सुनावण्यात आली आहे.
गुरुवारी वढोदाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आशुतोष बच्छाव यांनी मुक्ताईनगर व वढोदा वनपरिक्षेत्रातील क्षेत्रीय कर्मचारी आणि कार्यरत हंगामी मजूर यांच्यासह घटनास्थळी बेत दिली. झालेल्या अवैध वृक्षतोडीची जागेवर जाऊन पाहणी केली. संशयित आरोपींकडे डिस्कवर दुचाकी क्र. (एम.एच. २८, ए. सी. २००९), टीव्हीएसची विना क्रमांकाची दुचाकी, स्प्लेंडर दुचाकी क्र. (एम.एच. १२, एफ. ५६३६), तीन कुऱ्हाडी, एक वासला, दोन हात करवत पाते, १२ लोखंडी विळे, एक कोयता यासह सात साग, तीन आडजात लाकूड असे सर्व एकूण मुद्देमाल ५५ हजार २९० रुपयाचा जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई धुळे वनसंरक्षक दिगंबर पवार, जळगावचे उपवनसंरक्षक विवेक होशिंग, धुळे येथील विभागीय दक्षता वनाधिकारी उमेश वावरे, राजेंद्र राणे, आशुतोष बच्छाव, कुऱ्ह्याच्या वनपाल भावना मराठे, चारठाण्याचे वनपाल दिगंबर पाचपांडे, राजुऱ्याचे वनरक्षक विजय आहिरे, वायल्याचे वनरक्षक दि.एस. पवार आदींनी कारवाई केली आहे. तपास भावना मराठे करीत आहेत.








