रायपूरची घटना ; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील रायपूर कुसुंबा येथील दाम्पत्यासह दोघांना भाडेकरू कोठे गेले. असे विचारून क्षुल्लक कारणाने पाच जणांनी बेदम मारहाण करून शिवीगाळ केली. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत भीमसिंग शेनफडू परदेशी (वय-४८,रा.रायपूर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, पत्नीसह घरी असतांना बुधवारी १८ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी सचिन लक्ष्मण सोनार (रा. आयोध्यानगर), शिला विजयसिंग परदेशी, निता रमेश परदेशी, सागर विजय परदेशी, जयेश रमेश परदेशी (सर्व रा. कुसूंम्बा) यांनी येऊन म्हणाले की, तुमच्या रुममध्ये भाडे तत्वाने राहणारे भारती हिरासिंग परदेशी व हिरासिंग लक्ष्मण परदेशी हे कोठे गेले अशी विचारणा केली. त्यावेळी फिर्यादीने त्यांना ते घरी नसल्याचे सांगितले. त्याचे वाईट वाटून सचिन सोनार व त्याचेसोबतचे महिला व पुरुषांनी फिर्यादीला व त्याच्या पत्नीला चापटाबुक्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ केली. भांडण सोडविण्यासाठी फिर्यादीचे नातेवाईक सुनील भगवान परदेशी,श्रीराम सुरेश परदेशी असे भांडण सोडविण्यासाठी आल्याने त्यांनी त्यांना समजावुन सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु ते काही एक न ऐकता सचिन सोनार याने त्याचे हातातील फायटरने सुनील भगवान परदेशी याचे उजव्याकानावर मारहाण करुन दुखापत केली तसेच सागर परदेशी,जयेश परदेशी यांनी दगडांनी श्रीराम परदेशी यास मारहाण केली. शीला परदेशी व निता परदेशी यांनी सुध्दा फिर्यादीच्या पत्नीला चापटाबुक्यांनी मारहाण करून केस ओढुन दुखापत केली. सदर भांडणात पत्नी संगीता परदेशी यांचे गळ्यातील १५ ग्रँम सोन्याची व पोत सचिन लक्ष्मण सोनार याने हिसकावून घेतली. त्याचवेळी भाडेकरू भारती परदेशी व हिरासिंग परदेशी हे तेथे आल्याने त्यांना सुध्दा सागर परदेसी व जयेश परदेशी यांनी चापटा – बुक्क्यांनी मारहाण केली. त्यांनतर सचिन लक्ष्मण सोनार यांच्या ताब्यातील पल्सर मो.सा.क्र. (एम.एच. १९, सी. डब्लू. ५८२५) ही तेथेच सोडुन निघुन गेले आहे.
यावरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास संदीप हजारे करीत आहेत.







