जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील भुसावळ रोडवर हॉटेल कमल पॅराडाईजसमोर भरधाव ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने दोन जण जखमी झाले एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उसमा कमलेश वेद (वय-५१) नवी पेठ येथे कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. १७ मार्चरोजी दुपारी भुसावळ रोडवरील हॉटेल कमल पॅराडाईज समोरून (एमएच १९ सीएल ५२२०) क्रमांकाच्या मोटारसायकलवरुन जात होते. त्यावेळी त्यांच्यासोबत कमलेश वेददेखील होते. समोरुन एम एच 20 एच बी 36 78 क्रमांकाच्या मालट्रकने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली यामध्ये दोघे जण जखमी झाले आहेत. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उसमा वेद यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात ट्रक चालक मोहम्मद अजित मोहम्मद जमील ( रा. आधार ताल जबलपूर ( मध्यप्रदेश ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोहेकॉ विजय पाटील करीत आहेत.