जळगाव (प्रतिनिधी) – नमो ग्रुप फाउंडेशन जळगाव ग्रामीण जिल्हा अध्यक्ष राकेश गोसावी यांनी नमो ग्रुप फाउंडेशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रमोद परदेशी यांच्या निर्देशानुसार जळगाव जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.
या कार्यकारणीत महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी सौ. बिंदीया नांदेकर, जिल्हा युवती अध्यक्षपदी उमा बागुल सुर्यवंशी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी अक्षय चौधरी, जिल्हा सचिवपदी रितेश शिंपी, महेंद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्षपदी आशिष पाटील, दिपक माने, हेमंत देवरे, संतोष पाटील, सचिन पाटील, जिल्हा महासचिवपदी स्नेहल पाटील, जिल्हा सोशल मीडिया प्रमुखपदी अमित पाटील यांच्या तर जिल्हा संपर्क प्रमुखपदी संदिप पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन नमो ग्रुप फाउंडेशनचे जळगाव शहर अध्यक्ष निलेश चौधरी यांनी केले आहे.








