जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात राहणाऱ्या विवाहितेला कौटुंबिक कारणावरून पतीसह सासरच्या मंडळींनी शिवीगाळ व मारहाण केली. तसेच बनावट दस्तऐवज तयार करून विवाहितेच्या नोकरीच्या ठिकाणी दाखवत कामावरून काढण्यात यावे यासाठी प्रयत्न करणाऱ्या पतीसह सहा जणांविरूध्द रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

वैशाली रूपेश पाटील रा. कुंभारवाडा पिंप्राळा ह्या आपल्या पती रूपेश वासुदेव पाटील यांच्यासह राहतात. त्या खासगी नोकरीला आहे. त्याचे पतीही खासगी नोकरी करतात. यासाठी वैशाली रूपेश पाटील यांनी विवाहितेला पैश्यांसाठी शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरूवात केली. दरम्यान विवाहिता ही खासगी नोकरी करत असल्याने त्यांना पती व सासऱ्यांनी छळ करण्यास सुरूवात केली. पती रूपेश पाटील, निर्मलाबाई वासूदेव पाटील, नणंद रेखा प्रकाश देशमुख, निता सुकदेव महाजन, भारती संदीप महाजन आणि विमलबाई माळी यांनी देखील शिवीगाळ करून नोकरीस अडथळा निर्माण करण्यासाठी बनावट दस्तऐवज तयार करून कामाच्या ठिकाणी पाठविले होते. हा त्रास सहन न झाल्याने विवाहितेने रामानंद नगर पोलीस ठाण्यात पतीसह सारसच्या मंडळीविरूध्द तक्रार दाखल केली आहे. तक्रारीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सतीष डोलारे करीत आहे.







