जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग सहावरून भुसावळकडे जाणाऱ्या कारने आकाशवाणी चौकात अचानक पेट घेतल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पहावयास मिळाले.


राष्ट्रीय महामार्गावर आकाशवाणी चौकत कार आली असता ती सिग्नलवर उभी असतांना तीने अचानक पेट घेतला. या आगीचे लोळ उठून गाडी जळत होती. गाडीने पेट घेतल्याचे पाहून बघ्यांनी एकच गर्दी केली आहे. गाडीचा नंबर (जीजे ५ एच ९४४९) असून गाडीचे बोनेट व आतील आसन व्यवस्था देखील जळून खाक झाली आहे. सुदैवाने या आगीतून चार तरुण सुखरूप बचावले आहेत.







