नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – भाजप नेत्या खुशबू सुंदर यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव टँकरने धडक दिली असल्याने त्यांच्या कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. सुदैवाने खुशबू सुंदर यांचा कोणतीही दुखापत झालेली नाही.

मेलमरुवाथुरजवळ आज सकाळी भरधाव टँकरने खुशबू सुंदर यांच्या गाडीला धडक दिली. परंतु, कारमधील एअर बलून उघडल्याने त्या थोडक्यात बचावल्या. याबाबत खुशबू सुंदर यांनी ट्विटवरून सांगितले आहे.
माझी कार उजव्या बाजूच्या लेनमधून जात असताना हा टँकर अचानक आला आणि धडक दिली. पोलीस सध्या याप्रकरणी तपास करत असून चालकाची चौकशी करत आहेत, अशी माहिती खुशबू सुंदर यांनी दिली.
दरम्यान, तामिळनाडूमधील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खुशबू सुंदर भाजपाच्या प्रचारात सहभागी होण्यासाठी जात असताना हा अपघात झाला. अपघातानंतर खुशबू सुंदर यांनी पुढील प्रवास सुरुच ठेवला आहे.







