पाचोरा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर आठ जणांनी अमानुष अत्याचार केले या घटनेतील दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन चर्मकार विकास संघातर्फे पोलीस निरीक्षक किसनराव पाटील यांना देण्यात आले.
एका १३ वर्षीय मुलीला गावातीलच ६ मुलांनी अचानक उचलून शेतात नेले व तेथे तिला जीवे मारण्याची धमकी देत मुलीवर जबरदस्तीने अत्याचार केले ही हकीकत कुणालाही सांगीतल्यास याद राख अशी धमकी देऊन सकाळी तिन वाजेच्या सुमारास त्यांनी तिला महिलांच्या शौचालयाजवळ सोडून दिले व तेथुन पळ काढला घटना घडल्यापासून परिसरातच खळबळ उडाली असून पंचक्रोशीतील गावातून घटनेचा तिव्र निषेध करण्यात येत असून आरोपींना कठोर शासन व्हावे, अशी मागणी केली जात आहे.
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे भानुदास विसावे, राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव घोलप यांनी तिव्र निषेध केला असून आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावे, अशी मागणी केली आहे. यावेळी जळगाव जिल्हाध्यक्ष उत्तमराव मोरे, राज्य सदस्य धनराज पवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, मनोज पवार, ईश्वर अहिरे, रमेश पवार, गोवर्धन जाधव, समाधान लोखंडे, आय. एस. अहिरे, लता अहिरे, विनोद अहिरे, वरखेडीचे फकिरा गांगे, दिलीप आहिरे, मिलिंद अहिरे, विनोद खरे, नितीन तायडे, वसंत वाघ, राजु सावंत आदी कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना निवेदन देऊन आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावे अशी मागणी केली आहे.
पिडीत मुलीस व परिवारास त्वरित मदत मिळवून द्यावी, गुन्ह्याची चौकशी होऊन आरोपी सुटणार नाहीत याची काळजी घ्यावी, हा गुन्हा जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची किंवा फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे तपासात दिरंगाई केल्यास राज्यभरातून तिव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही दिला आहे.