जळगाव ( प्रतिनिधी ) – खोटेनगरातील शिव फर्निचर या दुकानाला बुधवारी उत्तररात्री आग लागून आगीत हे दुकान खाक झाले .
पोलीस मुख्यालयातील कर्मचारी पाटील यांच्या फोनवरून बुधवारी रात्री 2:40 मिनिटांनी खोटेनगर बस स्टॉप जवळ शिव फर्निचर या दुकानाला आग लागली असल्याची माहिती महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळाली होती. महाबळ फायर स्टेशन , गोलानी फायर स्टेशनच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्यात आली सहा.अग्निशमन अधिकारी सुनील मोरे ,हेड फायरमन अश्वजीत घरडे, रोहिदास चौधरी, भारत बारी , वाहन चालक देविदास सुरवाडे, वाहन चालक – संतोष तायडे, संजय भोईटे, वाहन चालक-प्रदीप धनगर, सरदार पाटील, भगवान पाटील, वसंत कोळी, जगदीश साळुंखे या कर्मचाऱ्यांनी आग विझवण्यात मदत केली . घटनास्थळी 9 बंब लागले . रात्री 2:40 पासून सकाळी 5 वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू होते.