जामनेर ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या तीस वर्षीय महिलेला कोल्ड्रिंक्समध्ये गुंगी आणणारा पदार्थ पाजून दोन जणांनी अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली जामनेर पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला यापैकी तिसरी आरोपी महिला आहे !
जामनेर तालुक्यातील एका गावात पीडित महिला कुटुंबियांसह राहते . एक वर्षापूर्वी गोविंदा जगन पवार, श्रीराम जाधव आणि मनीषा कैलास नाईक या तीन जणांनी या 30 वर्षीय महिलेला कोल्ड्रिंक्समध्ये गुंगी आणणारा पदार्थ पाजून जामनेर – भुसावळ दरम्यान एका हॉटेलवर नेऊन अनैसर्गिक अत्याचार केला होता .यावेळी अनैसर्गिक अत्याचार करतांना मनीषा नाईक हिने व्हीडीओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत !
याबाबत पीडित महिलेने जामनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी गोविंद पवार , श्रीराम जाधव आणि मनीषा नाईक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो नि किरण शिंदे करीत आहेत.