जळगाव ( प्रतिनिधी ) – मेहरून तलावासमोर रनिंग करण्यासाठी आलेल्या तरुणांच्या बॅगा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या मोबाईल आणि रोकड असा एकुण २८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लांबविला एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
विकी नागेश मुंडोकार (वय-२५ , रा. महादेव मंदिराजवळ मेहरूण ) हा तरुण स्पर्धा परीक्षांची तयारी करत असल्याने तो दररोज मेहरूण तलाव येथे मित्रांसोबत रनिंग करण्यासाठी जात असतो. १७ मार्चरोजी सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास विकी मुंडोकार त्याचा मित्र राधेश्याम नारायण चांदेकर ( रा. समतानगर ) , राकेश अरुण पाटील ( रा. रायसोनी नगर ) आणि अंकित बाळकृष्ण कापुरे ( रा. श्याम नगर, शिव कॉलनी ) असे रनिंगसाठी मेहरुन तलाव येथे गेले. तलावाजवळील कृष्णलॉनच्या मागील बाजूस मोकळ्या जागेवर त्यांनी दुचाक्या लावल्या आणि तेथेच बॅगा ठेवून रनिंगसाठी ट्रॅकवर गेले. अज्ञात चोरट्यांनी तेथे ठेवलेल्या चौघांच्या बॅगा चोरून नेल्या. चौघांनी परिसरात शोधाशोध केली परंतु कुठेही बँगा आढळून आल्या नाही. विकी मुंडोकार याचा १४ हजाराचा मोबाईल आणि राधेश्याम चांदेकर याचे १४ हजाराची रोकड असा २८ हजाराचा मुद्देमाल लांबविला. एमआयडीसी पोलीस ठाण्यात विकी मुंडोकार यांच्यासह त्याच्या मित्रांनी अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास अल्ताफ पठाण करीत आहेत .
=========================