धरणगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील तहसील कार्यालयाच्या आवारातील ट्रॅक्टर व ट्रॉली चोरीस गेली आहे. धरणगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तहसीलदार यांच्यातर्फे प्राधिकृत करण्यात आलेला आदेश गौणखनीज । काशी । 99 । 2022 दि. 16 मार्च 2022 नुसार तहसील कार्यालय धरणगाव आवारात लावलेलो 1 लाख 50 हजार रुपये किंमतीचे ट्रॅक्टर क्रमांक MH 19.BG.6071 व ट्रॉली अज्ञात व्यक्तीने चोरी करुन नेले हे ट्रॅक्सर व ट्रॉली बांभोरी येथील गिरणा नदीपात्रात वाळू चोरी करताना आढळून आले होते. त्यानंतर वाळू नदीपात्रात खाली करून नट्रॅक्टर व ट्रॉली तहसील कार्यालयात आणण्यात आले होते.
तलाठी अलताब निझाम पठाण (वय ३३ या. अनिता नगर धरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास स फौ. योगेश जोशी करीत आहेत दरम्यान हे ट्रॅक्स ट्रॉली चोरीटयाने चोरुन नेले की संगनमताने चोरी करु देण्यात आले. याबाबत गावात खंमग चर्चा सुरू आहे.