मुक्ताईनगर ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील रुईखेडा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून सात जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून १४ हजार २३० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुईखेडा गावी येथील राजाराम गणू लोखंडे यांच्या घराच्या मोकळ्या जागेमध्ये जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मुक्ताईनगर पोलीसांना मिळाली. १६ मार्चरोजी रात्री पोलिसांनी धाड टाकून १४ हजार २३० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पो कॉ रवींद्र धनगर यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सुनील विलास वराडे (वय-३५), गजानन त्र्यंबक वराडे (वय-४५), अनिल शामराव लोखंडे (वय-४१), गोपाळ सोपान पाटील (वय-३५), राजाराम गणू लोखंडे (वय-५८), शोक रमा सरोदे (वय-६०) आणि शालिक सलीम वंजारी वंजारी (वय-३२ , सर्व रा. रुईखेडा ) यांच्या विरोधात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.