पारोळा (प्रतिनिधी) – होळीनिमित्त पारोळा शहरात शहरावाशीयांकडून पुरणपोळी आणि खीर संकलन करून गरिबांची होळी गोड करण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
श्रीमंत व मध्यम वर्गातील लोक आनंदाने सण साजरा करतात पक्वान्नाचे भोजन करतात. परंतु, जे गरीब आहेत त्यांना एकवेळचे जेवणदेखील मिळत नाही. त्यासाठी सद्गुरू महिला मंडळ आणि सामाजिक संघटना यांच्यातर्फे शहरात एक पुरणपोळी गरिबांसाठी हा उपक्रम राबवित आला. या उपक्रमाला पारोळा शहरवासीयांनी साथ देत शेकडो पोळ्या दिल्या एका तरुणाने स्वतः खर्च करत पुरणपोळ्या विकत आणून माणुसकी धर्म पाळला.
यां उपक्रमासाठी सद्गुरू महिला मंडळाच्या संचालिका सुवर्णा पाटील यांनी मेहनत घेतली आहे. प्रा विकास पाटील, भिम आर्मीचे जितेंद्र वानखेडे, छावाचे विजय पाटील, प्रा शैलेश पाटील , राकेश बोरसे, जयश्री सळी, अन्नपूर्णा पाटील, गायत्री महाजन, मनीषा सोहनी, स्वाती शिंदे, सुरेखा शिंपी, जिजाबाई पाटील, जानवी पाटील , आशाबाई माळी, सुनंदा शेंडे यांनी सहकार्य केले. या उपक्रमाचे पारोळा शहरात कौतुक होत आहे.
======================