मुंबई (वृत्तसंस्था) – काही दिवसांपूर्वीचं 100 कोटींच्या खंडणी वसुलीप्रकरणात अटक करण्यात आलेले राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांना जामीन मिळाला. तसेच मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक अटकेत आहेत.
अशातच मलिकांना आणखी एक धक्का बसला असून त्यांचा मुलगा फराज मलिक याच्याविरोधात मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर गुन्हा दाखल असल्याने ते सध्या जेलमध्ये शिक्षा भोगत आहेत. अशात आता त्यांच्या कुटूंबाला मुंबई पोलिसांनी लक्ष केल्याचे दिसते. याबाबत अधिक माहिती अशी की, मलिक याचा मुलगा फराज मलिक याने व्हिजा बनवण्यासाठी कागदपते दिली होती. त्या कागदपत्रांची मुंबई पोलिसांनी तपासणी केली. यामध्ये काही कागदपत्रे हा बनावट असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर फिरोज मलिक याची चौकशी करत त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
भाजप नेते मोहित कम्बोज यांनी काही दिवसांपूर्वी ट्विट करत बनावट कागदपत्रांप्रकरणी माहिती दिली होती. त्यानंतर आता मुंबई पोलिसांकडून फराज मलिक याच्या विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी फराज मलिक यांच्याविरोधात फसवणूक प्रकरणी आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची आणखी चौकशी केली जात आहे.