रावेर ( प्रतिनिधी ) – रावेर तालुक्यातील विवरा येथे पिस्तुलचा धाक दाखवत जबरी लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील विवरे बुदुक येथील किशोर राणे यांच्या घरात घुसून चोट्यांनी जबरी लुट करून पलायन केल्याची घटना घडली आहे. सोमवारी रात्री ते लघुशंकेसाठी उठले असतांना अज्ञात चोरट्यांनी कानाला पिस्तुल लाऊन राणे यांना घरात नेले. यानंतर सोन्याचे दागिने व रोकड मागितली. यात कपाटातील दोन तोळे सोने, तसेच पंधरा हजार रूपये रोख असा ऐवज त्यांनी सोबत घेतला. यानंतर त्यांनी किशोर राणे यांचे हात-पाय व तोंड बांधून तेथून पळ काढला.
या प्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, किशोर राणे यांचे कुटुंबिय बाहेरगावी गेल्याने ते एकटेच घरी होते. रात्री लघुशंकेसाठी उठल्यानंतर चोरट्यांनी पिस्तुल लाऊन त्यांना जबरी लुटले.