मुंबई (वृत्तसंस्था) – “काँग्रेस पक्षाचे नेते दिवसाढवळ्या अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार अशा सिनेतारकांना धमकी देत आहेत. काँग्रेस पक्षाला झालेय तरी काय?,” असा खोचक सवाल भाजप नेते राम कदम यांनी काँग्रेसला केला. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्याविषयी बोलताना काँग्रसेचे नविर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. अमिताभ, अक्षय यांना शेतकऱ्यांचा विसर पडला असून त्यांच्या चित्रपटांचे चित्रिकरण होऊ देणार नाही, असा इशारा पटोले दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्यानंतर राम शिंदे यांनी वरील वक्तव्य केले. त्यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.

“राज्यातील काँग्रेस पक्षाचे नेते बॉलिवूडमधील अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेता अक्षय कुमार यांना धमकी देत आहेत. काँग्रेस पक्षाला झालेय तरी काय? असे असले तरी देशाचे बाजूने जो कोणी बोलेल, त्यांच्यासोबत संपूर्ण देश उभा आहे,” असे राम कदम म्हणाले.







