वाशिम (वृत्तसंस्था) – वाशिम जिल्ह्यात एका आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे हा संसर्ग वाढू नये, यासाठी विविध निर्बंध घालण्यात आले आहेत. नगरपालिका क्षेत्रात आवश्यक त्या उपाययोजना तातडीने हाती घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिलेत.

त्यानंतर आज सकाळपासूनच वाशिम शहरात पोलीस अधीक्षक वसंत परदेशी आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक मोरे यांनी शहरात विना मास्क फिरणाऱ्यावर कारवाई सुरु केली आहे. तसेच, शहरातील मोठ्या गर्दीचे ठिकाण होणारे महात्मा फुले मार्केट पूर्णतः बंद करण्यात आले आहे.
विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई
जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी वाशिम नगर परिषद क्षेत्रात गर्दीवर नियंत्रण आणण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर शहरात आज सकाळ पासून विनामास्क फिरणाऱ्यांवर नगर परिषदेने कारवाई सुरु केली आहे.
काम नसताना नागरिकांनी बाहेर पडू नये, तसेच जेष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी घरीच राहण्याचे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक मोरे यांनी केले आहे.







