जळगाव प्रतिनिधी ) – शहरातील लेंडी नाल्याजवळ धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या मयताची ओळख पटली असून शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
१५ एप्रिल रोजी सकाळी लेंडीनाला जवळील रेल्वे खांब क्रमांक ४२०/२९-३१ दरम्यान अनोळखी ४५ वर्षीय व्यक्तीचा धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना उघडकीला आली होती. जळगाव रेल्वे पोलिस चौकीत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तपास सहाय्यक फौजदार अनिंद्र नगराळे करीत होते.
हातावर गोंदलेले असल्यावरून मयताची ओळख पटली आहे. रविंद्र रामसिंग कोळी (वय-४५ रा. गोपाळपूरा, विठ्ठल पेठ ) असे मयताचे नाव आहे. १५ एप्रिल रोजी सकाळी ते घरातून बेपत्ता झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी सारिका, मुले- राहुल व हर्षल, आई सुमन, वडील रामसिंग कोळी आणि कैलास आणि गोपाळ हे दोन भाऊ असा परिवार आहे. १८ एप्रिलरोजी सकाळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला पुढील तपास सहायक फौजदार अनिंद्र नगराळे करीत आहेत.