मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – चमत्कारिक सुलेमानी दगड विकत देण्याचा बहाणा करुन एका भंगार व्यावसायिकाला सोन्याच्या एक लाख रुपये किमतीच्या चार अंगठ्या आणि खिशातील ६२ हजार रुपये रोख हिसकावण्याचा प्रकार मुक्ताईनगर तालुक्यात कु-हा हद्दीत उघडकीस आला आहे. घटनेप्रकरणी मुक्ताईंगर पोलिस स्टेशनला सात जणांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख युनुस शेख कादर बादशहा या भंगार व्यावसायीकाने याबाबत फिर्याद दिली आहे. मुक्ताईनगर तालुक्क्यातील लालगोटा या गावी संशयित आरोपींच्या घरात हा प्रकार घडला आहे. शेख युनुस हे श्रीनिवासन पुरुम तिरुपती जिल्हा चित्तुर आंध्र प्रदेशातील रहिवासी आहेत. १७ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. अक्काबाई जोगिंदर भोसले, शिवदत्त जोगिंदर भोसले, दयाल जोगिंदर भोसले, जोगिंदर राजवंती भोसले, शिवकिसन जोगिंदर भोसले, रितु मंटूस पवार आणि कृष्णा भोसले (सर्व रा. लालगोटा मुक्ताईनगर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. सहायक पोलिस निरीक्षक संदीप दुनगहू पुढील तपास करत आहेत.