जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील जुन्या बस स्टँड मागील मनीष कॉम्प्लेक्समधील तिसऱ्या माळ्यावर योगेश्वर क्रीडा व सांस्कृतिक मंडळ (धरणगाव) च्या नावाखाली चालवलेल्या जुगाराचा अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून रोकडसह लाखोंचा मुद्देमाल जप्त करत ३७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर दुसऱ्या घटनेत प्रसिद्ध कोंबडी बाजारातील जेएमपी मार्केटमध्ये दलित क्रीडा संस्थामध्ये जुगार खेळत असलेल्या संशयितांवर सहाय्यक पोलिस अधिक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने सोमवारी रात्री टाकलेल्या धाडीत १३ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १ लाख ८१ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या धाडीत अनेक बड्या हस्ती सापडल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. शहरातील जुने बस स्टॅन्ड मागील बाजूला मनीष कॉम्प्लेक्समध्ये तिसर्या माळ्यावर धरणगावचे ज्ञानेश्वर भादू महाजन यांनी योगेश्वर क्रीडा व सांस्कृतिक मंडळ (धरणगाव) च्या नावाखाली जुगाराचा अड्डा चालू करून त्या ठिकाणी लोकांना पैसा लावून हार-जीत झन्ना – मन्ना नावाचा पत्ता जुगाराचा खेळ खेळण्याची व्यवस्था केली आहे. तसेच तेथे जुगाराचा अड्डा चालू असून लोकांकडून जुगार खेळला जात आहे. सदर ठिकाणी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला असता तेथे ज्ञानेश्वर महाजन (रा मोठा माळीवाडा, धरणगाव), जितेंद्र प्रल्हाद माळी (रा. संजयनगर), चारुदत्त रवींद्र पाटील (रा. बळीराम पेठ), हरिशचंद्र प्रल्हाद बडगुजर (रा.शनिपेठ), हेमेंद्र संजय महाजन (रा. नवीपेठ), प्रवीण पाटील (रा आर.एल. कॉलनी), ललित गणेश चौधरी (रा.ईश्वर कॉलनी), सलीम खान मुसाखान (रा.शिवाजीनगर), अनिल माधवराव दायमा (रा.पोलन पेठ), रोहित राजेंद्र शिंदे (ईश्वर कॉलनी), हीतेंद्र मोतीलाल शर्मा (मानराज पार्क), अशोक सुभाष शर्मा (कांचन नगर), प्रवीण तूकाराम हिंगोले (महाबळ), जितेंद्र अनिल सोनार (रा.विठ्ठल पेठ), सय्यद रिजवान सय्यद जफर (खडका रोड भुसावळ), भूषण साहेबराव पाटील (पारख नगर,जळगाव), शेख शकील शेख रशीद (मेहरून), अरुण पाटील (गार्डी), मोतीलाल कृष्णानी (रा. सिंधी कॉलनी पाचोरा) रहेमनतुल्ला खान गुलशेर खान (नागझिरी मोहल्ला, रावेर), संदीप चौधरी (शिव कॉलनी), सतीश चौधरी (खोटे नगर), सुरेश कोळी (गुरुदेव नगर,जळगाव), समाधान सपकाळे (आयोध्यानगर, जळगाव), सय्यद इर्शाद अली बालम आली (रा.गेंदालाल मिल), मुनाफ रही मनियार (धरणगाव), शेख इब्राहिम शेख चांद (रा. शनिपेठ), गणेश आत्माराम महाजन (गुरव गल्ली धरणगाव) रवींद्र प्रतापसिंग क्षत्रिय (मोठा माळीवाडा, धरणगाव), मनोज जयंतीलाल राज (हरिओम आपारमेंट बोरवली मुंबई), सचिन गवळी (शनीपेठ जळगाव), गोपाळ वासुदेव बडगुजर (लोहार गल्ली धरणगाव), गुड्डू सहानी (सुप्रीम कॉलनी,जळगाव), गोविंदा विठ्ठल दापसे (जुना,आसोदारोड, जळगाव) शेख अब्दुल्ला शेख रहेमान (मराठे गल्ली धरणगाव), मयूर नरेंद्र चंदनकर (बळीराम पेठ,जळगाव), सागर भीमराव सोनवणे (वाल्मिक नगर, जळगाव) या ३७ आरोपींकडून रोकडसह, मोबाईल, कार, असा एकूण १९ लाख, ७० हजार ५०० रुपायचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि धनंजय येरुळे, पोनि भिमराब नांदुरकर, सपोनि संदिप परदेशी,सपोनि रविंद्र बागुल, उपनिरीक्षक अरुण सोनार, उपनिरिक्षक चंद्रकात पाटील, कॉन्स्टेबल फुसे, उन्हाळे, प्रणेश ठाकरे, रतन गिते व पोना किशोर निकुंभ यांच्या पथकाने केली आहे. दरम्यान, या धाडीमुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
तर दुसऱ्या घटनेत पोहेका उमेश भांडारकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवारी १६ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी कळविले की, गोपनीय माहितीवरून जेएमपी मार्केट येथे सट्टा व जुगार खेळला जात आहे. पोलिसांचे पथक पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे, किशोर निकुंभ, भीमराव नांदुरकर सपोनि रवींद्र बागुल, पोहेकॉ गणेश ठाकरे,अरुण सोनार, पोऊनी चंद्रकांत पाटील, उन्हाळे, प्रणेश ठाकरे, रतन गीते यांनी जेएमपी मार्केटला छापा टाकला. तेथे १३ संशयित जुगार खेळताना दिसून आले. त्यांच्याकडून पैसे, दुचाकी, मोबाईल मिळून १ लाख ८१ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीमध्ये बापू रघुनाथ सूर्यवंशी रा.गेंदालाल मिल, जुबेर फारुख खान रा. मास्टर कॉलनी, नजीर शफी पिंजारी रा.जुना कोळी पेठ, अब्दूल आहेद, शेख फैय्याजोद्दीन रा. शनिपेठ , आबेदखान शबीर खान , पंचशील नगर, तांबापुरा, अरमान रज्जाक पटेल, गेंदालाल मिल, मयूर संजय जगताप, रा. द्वारका नगर, परशुराम बन्सी चावरे रा.वाल्मिक नगर, सलीम शहा अब्बास शहा रा. रथ चौक, तुषार नरेंद्र वरयानी रा. सिंधी कॉलनी, सुखदेव ज्योतिराम गवळी, पंकज शरद पवार दोघी रा.रामेश्वर कॉलनी यांचा समावेश आहे.