धरणगाव ( प्रतिनिधी ) – धरणगाव शहरातील श्री स्वामी समर्थ नगरात सुरू असलेल्या मंदिराच्या बांधकामाचा ठिकाणाहून लोखंडी प्लेटांची चोरी झाली आहे. याबाबत अज्ञात चोरट्यांवर धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबात पोलिसांनी दिलेली माहितीवरून, गणेश प्रल्हाद महाजन (वय-५१) रा. लोहार गल्ली, धरणगाव हे आपल्या परिवारासह राहायला आहे. बांधकामाचा व्यवसाय करतात. सध्या त्यांनी धरणगाव शहरातील श्री स्वामी समर्थ नगरात मंदिराचे बांधकामाचे काम घेतले आहे. त्याठिकाणी त्यांनी त्यांच्या मालकीच्या लोखंडी प्लेटा ठेवलेल्या आहेत. २० ऑक्टोबर दुपारी १ ते अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या १७ हजार ६०० रुपये किमतीच्या ४४ लोखंडी सेंटिंगच्या प्लेटा चोरून नेल्याचे समोर आले. त्यांनी लोखंडी प्लेटांचा सर्वत्र शोध घेतला परंतू कुठेही मिळून आल्या नाही. अखेर एक महिन्यानंतर त्यांनी धरणगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून बुधवारी १६ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस नाईक प्रमोद पाटील करीत आहे.