जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील महिलेला पाचशे रूपयाची नोट दाखवून विनयभंग केला आहे. रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंप्राळा परिसरातील २५ वषीय महिला कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १५ मे रोजी सकाळी एहमद नुरशेख लतीफ ( रा. पिंप्राळा ) या तरूणाने महिलेला ५०० रूपयांची नोट दाखवून, पाचशे रूपये घे आणि माझ्यासोबत चल असे बोलून महिलेचा विनयभंग केला.
विवाहितेने रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. संशयित आरोपी एहमद नुरशेख लतीफ याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ सुशिल चौधरी करीत आहेत.