फैजपूर ( प्रतिनिधी ) – बामणोद येथील एकविरा मंदिरातील चांदीचे मुकूट, छत्र आणि दानपेटीतील रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल तालुक्यातील बामणोद गावाच्या बाहेर एकविरा मंदीर आहे. १४ मे रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मंदीराचे कुलूप तोडून १५ हजार रूपये किंमतीचा चांदीचा मुकूट, १५ हजार ३०० रूपये किंमतीचे छत्र आणि दानपेटीतील १ हजार रूपयांची रोकड असा ३१ हजार ३०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे १५ मे रोजी उघडकीला आले . रमेश गणपत सोनवणे ( रा. बामणोद ) यांनी फैजपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. १६ मे रोजी दुपारी फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोहेकॉ गोकुळ तायडे करीत आहेत.